राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून काही दिवसांपूर्वी ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक शहरासह जिल्हाभरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले.
मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळिराजावर संकट कोसळले आहे. त्यातच हवामानतज्ज्ञांनी सोमवार, 13 ते शुक्रवार, 30 मार्चपर्यंत पाच दिवस महाराष्ट्रात तरळक ठिकाणी विजा, गडगडाटीसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे. विशेषतः 15 ते 30मार्चच्या दरम्यान वातावरणाची तीव्रता अधिक जाणवते. या आठवड्याच्या काळात दिवसाच्या कमाल तापमानातही 2 अंशांनी घट होण्याची शक्यता जाणवते. जमिनीपासून साधारण 3 ते 7.5 किमी अशा साडेचार किमी हवेच्या जाडीत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेशापासून उत्तर प्रदेशापर्यंत त्या पातळीतून जाणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी व बंगालच्या उपसागरातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेमुळे इतर राज्याबरोबर महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
0 Comments